MHADA Nagpur Lottery 2024 :तुमच्या स्वप्नातील घराची किल्ली तुमच्या हाती! तुमच्या स्वप्नातील घरासाठी परवडणारी योजना, जाणून घ्या महत्त्वाची तारीख, पात्रता निकष आणि इतर माहिती..

nagpur lottery

स्वप्नातील घराची चावी तुमच्या हाती येऊ शकते! MHADA नागपूर लॉटरी २०२४ मध्ये सहभागी होण्याची संधी तुमच्यासाठी आली आहे. हे तुमच्या स्वप्नातील घराची मालकी मिळवण्याची एक परवडणारी आणि सोयीस्कर संधी असू शकते. या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही तुम्हाला अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता निकष, आणि इतर सर्व महत्वाची माहिती प्रदान करू. तसेच, आम्ही विजेत्यांची यादी कधी जाहीर होईल आणि पुढील टप्पे कोणते असतील याबद्दल माहिती देखील देऊ.

म्हाडा नागपूर मंडळाकडून दिनांक ०४ मार्च २०२४ रोजी एकूण ४१६ सदनिकांची महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. मंडळाने अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकूण ७२ आणि मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण ३४४ सदनिका अशी एकूण ४१६ घरांसाठी ही लॉटरी असून यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

nagpur lottery

MHADA Nagpur Lottery 2024 : म्हाडा ही गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारी अग्रगण्य संस्था आहे. विविध उत्पन्न गटातील नागरिकांसासाठी वाजवी किंमत व उत्कृष्ट दर्जा असलेली घरे बांधजण्यासाठी कार्यरत असणारी संस्था असा म्हाडाचं नावलौकिक आहे. आपल्या हक्काचं आणि स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. हेच लक्षात घेऊन म्हाडा, सिडकोकडून अल्प दरात घरे उपलब्ध करुन देण्यात येत असतात. आता म्हाडा नागपूर मंडळाकडून दिनांक ०४ मार्च २०२४ रोजी एकूण ४१६ सदनिकांची महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. जाणून घेऊयात या लॉटरीच्या संदर्भात संपूर्ण माहिती.

या योजनेत अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकूण ७२ आणि ३४४ सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी प्रवर्गातील नागरिकांसाठी आहेत.

लॉटरी साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही Mhada च्या https://housing.mhada.gov.in/ या संकेस्थळा वरती जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता.

MHADA Nagpur Lottery 2024 वेळापत्रक

सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध०४ मार्च २०२४
सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात०५ मार्च २०२४ सकाळी ११:०० वाजता
ऑनलाईन पेमेंट स्वीकृती सुरुवात०७ मार्च २०२४ सकाळी ११:०० वाजता
सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख व वेळ०२ एप्रिल २०२४ रात्री ११:५९ वाजता
ऑनलाईन पेमेंट स्विकृती अंतिम दिनांक०३ एप्रिल २०२४ रात्री ११:५९ वाजता
बँकेत RTGS / NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक०५ एप्रिल २०२४ रात्री ११:५९ वाजता
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी११ एप्रिल २०२४ सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत
प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासुन Online दावे हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक १३ एप्रिल २०२४ सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी१९ एप्रिल २०२४ सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत
सोडत
स्वतंत्रपणे कळविण्यात येईल
सोडतीमधील यशस्वी आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नवे संकेतस्थळावर प्रसिध्द करणेस्वतंत्रपणे कळविण्यात येईल

(म्हाडा) लॉटरी प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिता? आम्ही स्वतंत्र ब्लॉग पोस्टमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया याची सविस्तर माहिती दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

MHADA Nagpur Lottery 2024: लॉटरी पात्रतेच्या अटी

  1. अर्ज करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी नसावे.
  2. अर्जदार किंवा त्याची पती/पत्नी यांचे किंवा त्यांची अज्ञान मुले यांचे नवे मालकी तत्वावर , भाडे खरेदी तत्वावर, अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून ज्या योजनांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्या योजनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ( नगरपालिका / महानगरपालिका / ग्रामपंचायत इत्यादी च्या ) हद्दीत म्हाडाने वितरित केलेला , शासनाने वितरित केलेला किंवा खाजगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा / निवासी भूखंड नसावा. यासंबंधी म्हाड विनियमातील तरतूद खालील प्रमाणे आहे.
    Regulation 9 (A) – A person shall not be eligible to apply for any tenements in municipal area if he or his / her spouse or his / her minor children own a house or a flat or a residential plot of land or holds on a hire – purchase basis or outright sale basis or on a rental basis from the Maharashtra Housing and Area Development Authority a house or a flat or a residential plot of land in his / her name or in the name of his / her minor children as the case may be, in such a municiple area.
  3. अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग २० वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान १५ वर्षे सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र (domicile certificate) सादर करावे लागेल . केंद्रशासन कर्मचारी (CG) प्रवर्गकरिता सादर अट शिथिल राहील.
  4. दिनांक ०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२३ या कालावधीतील अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खाली दर्शविल्याप्रमाणे असावे.
    “कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे व त्याची पती/पत्नी यांचे दोघांचे मिळून वार्षिक नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून, जीविथार्थाचे सर्वसाधारण साधन म्हणून उत्पन्न.”
    दिनांक ०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२३ या कालावधीत झालेल्या उत्पन्नाच्या प्राप्तीवरून आयकर विवरण पत्र अथवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखल पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरूपाचा उत्पन्न स्रोतांबाबतची कागदपत्र / दाखले / पुरावे / प्रतिज्ञापत्र / वेतप्रमाणपत्र इ. संकणकिय प्रणालीमध्ये ग्राह्य धरली जाणार नाही, याची विशेष नोंद घ्यावी.

Mhada lottery 2024: उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे

अर्जदाराची गटनिहाय वार्षिक कौटुंबिक कमाल मर्यादा (रुपये वार्षिक) खालीलप्रमाणे राहील

अ. क्रउत्पन्न गटसुधारित कमाल मर्यादा (रुपये वार्षिक)
  छ. संभाजीनगर शहर तसेच १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र ( संकेत क्रं. २४५ ते २५८ करिता )उर्वरीत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र (संकेत क्रं. २०८ ते २३५ करिता )
1अत्यल्प उत्पन्न गट
(EWS)
रुपये ६,००,०००/- पर्यंतरुपये ४,५०,०००/- पर्यंत
2अल्प उत्पन्न गट
(LIG)
रुपये ९,००,०००/- पर्यंतरुपये ७,५०,०००/- पर्यंत
3मध्यम उत्पन्न गट
(MIG)
रुपये ९,००,०००/- ते रुपये १२,००,०००/- पर्यंतरुपये १२,००,०००/- पर्यंत
4उच्च उत्पन्न गट
(HIG)
कमाल मर्यादा नाहीकमाल मर्यादा नाही
टिप – उपरोक्त ४ ही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी ,
१) अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प उत्पन्न व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
२) अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प उत्पन्न व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
३) मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम उत्पन्न व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
४) उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.

Mhada nagpur lottery 2024: सोडतीसाठी नोंदणी करीत असताना सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदार स्वतःचे व विवाहित असल्यास पती / पत्नी या दोघांचे आधारकार्ड.
  2. अर्जदार स्वतःचे पॅन कार्ड व विवाहित असल्यास पती / पत्नी या दोघांचे पॅन कार्ड.
  3. अर्जदार सध्या वास्त्यव्यास असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता व पोस्टाचा पिन कोडे क्रमांक. सुस्वप्ष्टपणे नोंद करणे जेणेकरून मंडळाद्वारे होणार पत्रव्यवहार हा अर्जदारास योग्य त्या पत्त्यावर प्राप्त होईल.
  4. अर्जदाराचा आधारकार्डशी संलग्न (Linked) स्वतःचा भ्रमणध्वनी (Mobile No.) क्रमांक व ई-मेल आय.डी (Email ID)
  5. अर्जदाराचे महाराष्टातील वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) (सन -२०१९ नंतरचे )
  6. उत्पन्नाच्या स्रोताकरिता पात्र उत्पन्न गटानुसार अर्जदाराचे दिनांक ०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२३ (Assessment Year 2023-24) मधील आयकर विवरण पत्र अथवा दिनांक ०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२३ तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला
  7. आरक्षित प्रवर्गकरिता जातीचा दाखला व जात वैधता (पडताळणी) प्रमाणपत्र.
  8. जर आपणाला विशेष आरक्षित प्रवर्गातून (कलाकार,पत्रकार, राज्य शासन कर्मचारी, केंद्र शासन कर्मचारी,स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक व त्या वरील अवलंबीत व्यक्ती, म्हाडा कर्मचारी, दिव्यांग, आमदार व खासदार) अर्ज करवायचा असल्यास योग्य त्या प्रवर्गासमोरील ‘हो’ पर्याय निवडावा.
    विशेष सूचना : – विशेष आरक्षित प्रवर्गातील अर्जदाराने सादर केलेले प्रमाणपत्र हे सक्षम प्राधिकरणाकडून साक्षांकीत नसेल व जरी असे प्रमाणपत्र संगणकीय प्रणालीने स्विकारले तरी अशा अर्जदारांचे अर्ज कोणत्याही वेळी रद्द होण्यास पात्र असतील.

Mhada nagpur lottery : अनामत रक्कम आणि रक्कम भरायची पद्धती

अ. क्रउत्पन्न गटअनामत रक्कमअर्जासोबत भरवायची अनामत रक्कम व अर्ज शुल्क
रु.६०० /- + (जीएसटी @१८% )रुपये १०८/-
= एकूण  रु.७०८/-(विनापरतावा)
1अत्यल्प उत्पन्न गट
(EWS)
रुपये ५०००/-रुपये ५७०८/-
2अल्प उत्पन्न गट
(LIG)
रुपये १००००/-रुपये १०७०८/-
3मध्यम उत्पन्न गट
(MIG)
रुपये १५०००/-रुपये १५७०८/-
4उच्च उत्पन्न गट
(HIG)
रुपये २५०००/-रुपये २५७०८/-
अर्जदार रक्कम भरण्यासाठी Internet Banking/ Net Banking, RTGS, NEFT, Credit/Debit Card या पद्धतीचा वापर करू शकतात.

Mhada nagpur lottery : लॉटरी मध्ये विक्रीसाठी  उपलब्ध असलेल्या  सदनिकांचा तपशील

संकेत क्रमांकयोजनेचे नावउत्पन्न गटअनामत रक्कमअंदाजित विक्री किंमतचटई क्षेत्रफळ
(चौ. मीटर)
एकूण
सदनिका
231२२४ सदनिका म्हाडा सिटी , सुभाष रोड नागपूरमध्यम गट उत्पन्न
(MIG )
१५७०८६१७९२५०/- ते ६२६२५४०/-७२.३९ ते ७४.९४२२४
232१२० सदनिका म्हाडा सिटी , सुभाष रोड नागपूरमध्यम गट उत्पन्न
(MIG )
१५७०८६२८११००/- ते ६३६९५६०/-७४.२० ते ७४.५११२०
187७२ सदनिका बेलतरोडी, नागपूरअत्यल्प गट उत्पन्न
 (EWS)
५७०८१४९७६०७/-२९.९६७२
     Total४१६

Mhada nagpur lottery : लॉटरी मध्ये विक्रीसाठी  उपलब्ध असलेल्या सदनिकांचा महारेरा नोंदणी क्रमांक

अ.क्रसंकेत क्रमांकयोजनेचे नावमहारेरा नोंदणी क्रमांक
1231२२४ सदनिका म्हाडा सिटी , सुभाष रोड नागपूरP5050052672
2232१२० सदनिका म्हाडा सिटी , सुभाष रोड नागपूरP5050052608
3187७२ सदनिका बेलतरोडी, नागपूरP50500516949

Mhada nagpur lottery: माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक(Helpline Numbers)

अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक : 022-6946800 (Probity Software)
इंडसइंड बँक हेल्पलाइन क्रमांक- 01146869000
इंडसइंड बँक ई-मेल : – pgsupport@billdesk.com
मा. मुख्य अधिकारी / नागपूर मंडळ याचा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक : 0712-2562239
मा.मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी / प्रा यांचाकार्यालयीनदूरध्वनी क्रमांक : 0712-2560649

अधिक वाचा : म्हाडा छत्रपती संभाजी नगर लॉटरी पूर्ण माहिती Blog post

mhada nagpur lottery : २२४ सदनिका म्हाडा सिटी , सुभाष रोड नागपूर Floor image

nagpur lottery
nagpur lottery

mhada nagpur lottery : १२० सदनिका म्हाडा सिटी , सुभाष रोड नागपूर Floor image

nagpur lottery floor image
nagpur lottery

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top