MHADA Pune Lottery 2024 :पुणे लॉटरीबद्दल तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती, जाणून घ्या महत्त्वाची तारीख, पात्रता निकष आणि इतर माहिती..

Pune Lottery

Mhada Pune Lottery 2024: पुण्यात स्वस्त घराचे स्वप्न पाहत आहात? तुमच्या स्वप्नातील घराची किल्ली MHADA पुणे लॉटरीमध्ये असू शकते! ही लॉटरी स्वस्त दरात घर खरेदी करण्याची एक उत्तम संधी आहे, विशेषत: पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांसाठी. परंतु पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांबद्दल तुम्हाला गोंधळ असू शकतो. चिंता करू नका! हे ब्लॉग पोस्ट तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल आणि तुम्हाला MHADA पुणे लॉटरीमध्ये यशस्वी अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन करेल. चला लगेच सुरुवात करूया!

म्हाडा पुणे मंडळाकडून दिनांक ०७ मार्च २०२४ रोजी एकूण ४८८२ सदनिकांची महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. मंडळाने प्रधान मंत्री आवास योजने मध्ये आहेत एकूण ५९ सदनिका, खाजगी शासकीय योजना मध्ये आहेत एकूण ९७८सदनिका, म्हाडा गृह निर्माण प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य मध्ये आहेत एकूण २४१६ सदनिका आणि २०% हौसिंग योजने मध्ये आहेत एकूण १३५९ सदनिका अशी एकूण ४८८२ घरांसाठी ही लॉटरी असून यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

Pune Lottery

MHADA Pune Lottery 2024 : म्हाडा ही गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारी अग्रगण्य संस्था आहे. विविध उत्पन्न गटातील नागरिकांसासाठी वाजवी किंमत व उत्कृष्ट दर्जा असलेली घरे बांधजण्यासाठी कार्यरत असणारी संस्था असा म्हाडाचं नावलौकिक आहे. आपल्या हक्काचं आणि स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. हेच लक्षात घेऊन म्हाडा, सिडकोकडून अल्प दरात घरे उपलब्ध करुन देण्यात येत असतात. आता म्हाडा पुणे मंडळाकडून दिनांक ०७ मार्च २०२४ रोजी एकूण ४८८२ सदनिकांची महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. जाणून घेऊयात या लॉटरीच्या संदर्भात संपूर्ण माहिती.

या लॉटरी मध्ये प्रधान मंत्री आवास योजने मध्ये एकूण ५९ सदनिका, खाजगी शासकीय योजना मध्ये एकूण ९७८सदनिका, म्हाडा गृहनिर्माण प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य मध्ये आहेत एकूण २४१६ सदनिका आणि २०% हौसिंग योजने मध्ये आहेत एकूण १३५९ सदनिका अशी एकूण ४८८२ घरांसाठी ही लॉटरी आहे.

लॉटरी साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही Mhada च्या https://housing.mhada.gov.in/ या संकेस्थळा वरती जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता.

MHADA Pune Lottery 2024 वेळापत्रक

ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची सुरुवात०७ मार्च २०२४ दुपारी ०३:०० वाजत
सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात०८ मार्च २०२४ दुपारी ०३:०० वाजता
ऑनलाईन पेमेंट स्वीकृती सुरुवात०८ मार्च २०२४ दुपारी ०३:०० वाजता
ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची शेवटची तारीख व वेळ०८ एप्रिल २०२४ सायंकाळी ०५:०० वाजता
सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख व वेळ१० एप्रिल २०२४ रात्री ११:५९ वाजता
ऑनलाईन पेमेंट चा अंतिम दिनांक१२ एप्रिल २०२४ रात्री ११:५९ वाजता
बँकेत RTGS / NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक१२ एप्रिल २०२४
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी२४ एप्रिल २०२४ सायंकाळी ०७:०० वाजता
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी३० एप्रिल २०२४ सायंकाळी ०७:०० वाजता
सोडत
०८ मे २०२४ सकाळी १०.०० वाजता
सोडतीमधील यशस्वी आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नवे संकेतस्थळावर प्रसिध्द करणेसोडतीच्या दिवशी सायंकाळी ०६.०० वाजता
सोडतीचे स्थळ गृहनिर्माण भवन आगरकर नगर , म्हाडा कार्यालय पुणे

(म्हाडा) लॉटरी प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिता? आम्ही स्वतंत्र ब्लॉग पोस्टमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया याची सविस्तर माहिती दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

MHADA Pune Lottery 2024: लॉटरी पात्रतेच्या अटी

  1. अर्ज करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी नसावे.
  2. अर्जदार किंवा त्याची पती/पत्नी यांचे किंवा त्यांची अज्ञान मुले यांचे नवे मालकी तत्वावर , भाडे खरेदी तत्वावर, अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून ज्या योजनांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्या योजनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ( नगरपालिका / महानगरपालिका / ग्रामपंचायत इत्यादी च्या ) हद्दीत म्हाडाने वितरित केलेला , शासनाने वितरित केलेला किंवा खाजगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा / निवासी भूखंड नसावा. यासंबंधी म्हाड विनियमातील तरतूद खालील प्रमाणे आहे.
    Regulation 9 (A) – A person shall not be eligible to apply for any tenements in municipal area if he or his / her spouse or his / her minor children own a house or a flat or a residential plot of land or holds on a hire – purchase basis or outright sale basis or on a rental basis from the Maharashtra Housing and Area Development Authority a house or a flat or a residential plot of land in his / her name or in the name of his / her minor children as the case may be, in such a municiple area.
  3. अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग २० वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान १५ वर्षे सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र (domicile certificate) सादर करावे लागेल . केंद्रशासन कर्मचारी (CG) प्रवर्गकरिता सादर अट शिथिल राहील.
  4. दिनांक ०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२३ या कालावधीतील अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खाली दर्शविल्याप्रमाणे असावे.
    “कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे व त्याची पती/पत्नी यांचे दोघांचे मिळून वार्षिक नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून, जीविथार्थाचे सर्वसाधारण साधन म्हणून उत्पन्न.”
    दिनांक ०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२३ या कालावधीत झालेल्या उत्पन्नाच्या प्राप्तीवरून आयकर विवरण पत्र अथवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखल पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरूपाचा उत्पन्न स्रोतांबाबतची कागदपत्र / दाखले / पुरावे / प्रतिज्ञापत्र / वेतप्रमाणपत्र इ. संकणकिय प्रणालीमध्ये ग्राह्य धरली जाणार नाही, याची विशेष नोंद घ्यावी.

Mhada lottery 2024: उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे

अर्जदाराची गटनिहाय वार्षिक कौटुंबिक कमाल मर्यादा (रुपये वार्षिक) खालीलप्रमाणे राहील

अ. क्रउत्पन्न गटसुधारित कमाल मर्यादा (रुपये वार्षिक)
  मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे महानगर क्षेत्र(PMRDA), नागपूर महानगर क्षेत्र(NMRDA), नागपूर सुधार प्रन्यास(NIT) प्रदेश तसेच १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतगर्त क्षेत्र उर्वरीत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र
1अत्यल्प उत्पन्न गट (EWS)रुपये ६,००,०००/- पर्यंतरुपये ४,५०,०००/- पर्यंत
2अल्प उत्पन्न गट
(LIG)
रुपये ९,००,०००/- पर्यंतरुपये ७,५०,०००/- पर्यंत
3मध्यम उत्पन्न गट
(MIG)
रुपये १२,००,०००/- पर्यंतरुपये १२,००,०००/- पर्यंत
4उच्च उत्पन्न गट
(HIG)
कमाल मर्यादा नाहीकमाल मर्यादा नाही
टिप – उपरोक्त ४ ही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी ,
१) अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प उत्पन्न व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
२) अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प उत्पन्न व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
३) मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम उत्पन्न व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
४) उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.

Mhada Pune Lottery 2024: सोडतीसाठी नोंदणी करीत असताना सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदार स्वतःचे व विवाहित असल्यास पती / पत्नी या दोघांचे आधारकार्ड.
  2. अर्जदार स्वतःचे पॅन कार्ड व विवाहित असल्यास पती / पत्नी या दोघांचे पॅन कार्ड.
  3. अर्जदार सध्या वास्त्यव्यास असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता व पोस्टाचा पिन कोडे क्रमांक. सुस्वप्ष्टपणे नोंद करणे जेणेकरून मंडळाद्वारे होणार पत्रव्यवहार हा अर्जदारास योग्य त्या पत्त्यावर प्राप्त होईल.
  4. अर्जदाराचा आधारकार्डशी संलग्न (Linked) स्वतःचा भ्रमणध्वनी (Mobile No.) क्रमांक व ई-मेल आय.डी (Email ID)
  5. अर्जदाराचे महाराष्टातील वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) (सन -२०१९ नंतरचे )
  6. उत्पन्नाच्या स्रोताकरिता पात्र उत्पन्न गटानुसार अर्जदाराचे दिनांक ०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२३ (Assessment Year 2023-24) मधील आयकर विवरण पत्र अथवा दिनांक ०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२३ तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला
  7. आरक्षित प्रवर्गकरिता जातीचा दाखला व जात वैधता (पडताळणी) प्रमाणपत्र.
  8. जर आपणाला विशेष आरक्षित प्रवर्गातून (कलाकार,पत्रकार, राज्य शासन कर्मचारी, केंद्र शासन कर्मचारी,स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक व त्या वरील अवलंबीत व्यक्ती, म्हाडा कर्मचारी, दिव्यांग, आमदार व खासदार) अर्ज करवायचा असल्यास योग्य त्या प्रवर्गासमोरील ‘हो’ पर्याय निवडावा.
    विशेष सूचना : – विशेष आरक्षित प्रवर्गातील अर्जदाराने सादर केलेले प्रमाणपत्र हे सक्षम प्राधिकरणाकडून साक्षांकीत नसेल व जरी असे प्रमाणपत्र संगणकीय प्रणालीने स्विकारले तरी अशा अर्जदारांचे अर्ज कोणत्याही वेळी रद्द होण्यास पात्र असतील.

Mhada Pune Lottery : अनामत रक्कम आणि रक्कम भरायची पद्धती

योजनाउत्पन्न गट अनामत रक्कम
म्हाडा गृहनिर्माण
( प्रधानमंत्री आवास योजना)
अत्यल्प (EWS )रु. १५०००/- अधिक (अर्जाची किंमत ६०० + GST  १८० एकूण रु. ७०८/- विनापरतावा)
प्रधानमंत्री आवास योजना(PPP)रु. १५०००/- अधिक (अर्जाची किंमत ६०० + GST  १८० एकूण रु. ७०८/- विनापरतावा)
म्हाडा गृहनिर्माण योजनारु. १५०००/- अधिक (अर्जाची किंमत ६०० + GST  १८० एकूण रु. ७०८/- विनापरतावा)
२०% सर्व समावेशक
योजना
रु. १५०००/- अधिक (अर्जाची किंमत ६०० + GST  १८० एकूण रु. ७०८/- विनापरतावा)
पुणे महानगर पालिका हद्दीतील योजनाअल्प (LIG)रु. २००००/- अधिक (अर्जाची किंमत ६०० + GST  १८० एकूण रु. ७०८/- विनापरतावा)
म्हाडा गृहनिर्माण योजना
प्रथम येण्याऱ्यास प्रथम प्राधान्य
अत्यल्प (EWS )रु. २५०००/- अधिक (अर्जाची किंमत ६०० + GST  १८० एकूण रु. ७०८/- विनापरतावा)
अल्प (LIG)रु. ५००००/- अधिक (अर्जाची किंमत ६०० + GST  १८० एकूण रु. ७०८/- विनापरतावा)
मध्यम उत्पन्न गट (MIG)रु. ७५०००/- अधिक (अर्जाची किंमत ६०० + GST  १८० एकूण रु. ७०८/- विनापरतावा)
उच्च उत्पन्न गट (HIG)रु. १०००००/- अधिक (अर्जाची किंमत ६०० + GST  १८० एकूण रु. ७०८/- विनापरतावा)

Mhada Pune Lottery: माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक(Helpline Numbers)

अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक : 022-69468100 (Probity Software)
Indian Bank हेल्पलाइन क्रमांक- 18008918297,9529485780,7066047214
Indian Bank ई-मेल : – support@easebuzz.in , shishir.shetty@easebuzz.in
मा. मुख्य अधिकारी / पुणे मंडळ याचा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक : 022-26121830/26128868
मा.मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी / प्रा यांचा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक : 022-66405448

अधिक वाचा : म्हाडा छत्रपती संभाजी नगर लॉटरी पूर्ण माहिती Blog post

mhada Pune Lottery: Building Images(As per Mhada Website)

mhada Pune Lottery

pune lottery
pune lottery
pune lottery
pune lottery

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top