Mhada Lottery 2024 : म्हाडा छत्रपती संभाजी नगर एकूण १३०२ सदनिकांची लॉटरी जाहीर; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे, सदनिकांची किंमत आणि सदनिकांचे ठिकाण…

Ch. Sambhaji Nagar Lottery

म्हाडा छत्रपती संभाजी नगर मंडळाकडून दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी एकूण १३०२ सदनिकांची महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. मंडळाने विविध उत्पन्न गटातील अशी एकूण १३०२ घरांसाठी ही लॉटरी असून यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

Ch. Sambhaji Nagar Lottery

म्हाडा छत्रपती संभाजीनगर (mhada Lottery 2024) : म्हाडा ही गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारी अग्रगण्य संस्था आहे. विविध उत्पन्न गटातील नागरिकांसासाठी वाजवी किंमत व उत्कृष्ट दर्जा असलेली घरे बांधजण्यासाठी कार्यरत असणारी संस्था असा म्हाडाचं नावलौकिक आहे. आपल्या हक्काचं आणि स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. हेच लक्षात घेऊन म्हाडा, सिडकोकडून अल्प दरात घरे उपलब्ध करुन देण्यात येत असतात. आता म्हाडा छत्रपती संभाजी नगर मंडळाकडून लॉटरी २०२४ ची घोषणा करण्यात आली आहे. दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी काढण्यात आलेल्या या लॉटरी मध्ये विविध उत्पन्न गटातील अशी एकूण १३०२ घरांचा समावेश आहे. जाणून घेऊयात या लॉटरीच्या संदर्भात अधिक माहिती.

लॉटरी साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही mahda lottery च्या https://housing.mhada.gov.in/ या संकेस्थळा वरती जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता.

म्हाडा छत्रपती संभाजी नगर २०२४ वेळापत्रक (mhada lottery 2024 Time Table)

सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध२८ फेब्रुवारी २०२४
ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरुवात२८ फेब्रुवारी २०२४ दुपारी १२:०० वाजता
सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात२८ फेब्रुवारी २०२४ दुपारी १२:०० वाजता
ऑनलाईन पेमेंट स्वीकृती सुरुवात २८ फेब्रुवारी २०२४ दुपारी १२:०० वाजता
सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आणि वेळ२७ मार्च २०२४ रात्री ११:५९ वाजता
ऑनलाईन पेमेंटचा अंतिम दिनांक२७ मार्च २०२४ रात्री ११:५९ वाजता
बँकेत RTGS / NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक२८ मार्च २०२४
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी०४ एप्रिल २०२४ दुपारी ०३:०० वाजता
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी१२ एप्रिल २०२४ दुपारी ०३:०० वाजता
सोडत दिनांक व स्थळअर्जदारांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल
सोडतीमधील यशस्वी आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नवे संकेतस्थळावर प्रसिध्द करणेसोडतीच्या दिवशी दुपारी ०४:०० वाजता

म्हाडा छत्रपती संभाजी नगर (mhada lottery 2024) लॉटरी पात्रतेच्या अटी

  1. अर्ज करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी नसावे.
  2. अर्जदार किंवा त्याची पती/पत्नी यांचे किंवा त्यांची अज्ञान मुले यांचे नवे मालकी तत्वावर , भाडे खरेदी तत्वावर, अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून ज्या योजनांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्या योजनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ( नगरपालिका / महानगरपालिका / ग्रामपंचायत इत्यादी च्या ) हद्दीत म्हाडाने वितरित केलेला , शासनाने वितरित केलेला किंवा खाजगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा / निवासी भूखंड नसावा. यासंबंधी म्हाड विनियमातील तरतूद खालील प्रमाणे आहे.
    Regulation 9 (A) – A person shall not be eligible to apply for any tenements in municipal area if he or his / her spouse or his / her minor children own a house or a flat or a residential plot of land or holds on a hire – purchase basis or outright sale basis or on a rental basis from the Maharashtra Housing and Area Development Authority a house or a flat or a residential plot of land in his / her name or in the name of his / her minor children as the case may be, in such a municiple area.
  3. अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग २० वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान १५ वर्षे सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र (domicile certificate) सादर करावे लागेल . केंद्रशासन कर्मचारी (CG) प्रवर्गकरिता सादर अट शिथिल राहील.
  4. दिनांक ०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२३ या कालावधीतील अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खाली दर्शविल्याप्रमाणे असावे.
    “कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे व त्याची पती/पत्नी यांचे दोघांचे मिळून वार्षिक नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून, जीविथार्थाचे सर्वसाधारण साधन म्हणून उत्पन्न.”
    दिनांक ०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२३ या कालावधीत झालेल्या उत्पन्नाच्या प्राप्तीवरून आयकर विवरण पत्र अथवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखल पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरूपाचा उत्पन्न स्रोतांबाबतची कागदपत्र / दाखले / पुरावे / प्रतिज्ञापत्र / वेतप्रमाणपत्र इ. संकणकिय प्रणालीमध्ये ग्राह्य धरली जाणार नाही, याची विशेष नोंद घ्यावी.

mhada lottery 2024: उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे

अर्जदाराची गटनिहाय वार्षिक कौटुंबिक कमाल मर्यादा (रुपये वार्षिक) खालीलप्रमाणे राहील

अ. क्रउत्पन्न गटसुधारित कमाल मर्यादा (रुपये वार्षिक)
  छ. संभाजीनगर शहर तसेच १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र ( संकेत क्रं. २४५ ते २५८ करिता )उर्वरीत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र (संकेत क्रं. २०८ ते २३५ करिता )
1अत्यल्प उत्पन्न गट
(EWS)
रुपये ६,००,०००/- पर्यंतरुपये ४,५०,०००/- पर्यंत
2अल्प उत्पन्न गट
(LIG)
रुपये ९,००,०००/- पर्यंतरुपये ७,५०,०००/- पर्यंत
3मध्यम उत्पन्न गट
(MIG)
रुपये १२,००,०००/- पर्यंतरुपये १२,००,०००/- पर्यंत
4उच्च उत्पन्न गट
(HIG)
कमाल मर्यादा नाहीकमाल मर्यादा नाही
5सर्व उत्पन्न गट
(AIG)
उत्पन्न मर्यादा नाहीउत्पन्न मर्यादा नाही
टिप – उपरोक्त ४ ही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी ,
१) अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प उत्पन्न व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
२) अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प उत्पन्न व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
३) मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम उत्पन्न व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
४) उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
५) सर्व उत्पन्न गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. ( संकेत क्रं. २३६ ते २४४ करिता )

विशेष सूचना – पंतप्रधान आवास योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या (संकेत क्रं. २०३ ते २०७)
अर्जदाराचे पती /पत्नीचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (सन २०२२-२०२३ या कालावधीचे) रु. तीन लक्ष (३०००००/-) पेक्षा जास्त नसावे.

mhada lottery 2024: सोडतीसाठी नोंदणी करीत असताना सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदार स्वतःचे व विवाहित असल्यास पती / पत्नी या दोघांचे आधारकार्ड.
  2. अर्जदार स्वतःचे पॅन कार्ड व विवाहित असल्यास पती / पत्नी या दोघांचे पॅन कार्ड.
  3. अर्जदार सध्या वास्त्यव्यास असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता व पोस्टाचा पिन कोडे क्रमांक. सुस्वप्ष्टपणे नोंद करणे जेणेकरून मंडळाद्वारे होणार पत्रव्यवहार हा अर्जदारास योग्य त्या पत्त्यावर प्राप्त होईल.
  4. अर्जदाराचा आधारकार्डशी संलग्न (Linked) स्वतःचा भ्रमणध्वनी (Mobile No.) क्रमांक व ई-मेल आय.डी (Email ID)
  5. अर्जदाराचे महाराष्टातील वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) (सन -२०१९ नंतरचे )
  6. उत्पन्नाच्या स्रोताकरिता पात्र उत्पन्न गटानुसार अर्जदाराचे दिनांक ०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२३ (Assessment Year 2023-24) मधील आयकर विवरण पत्र अथवा दिनांक ०१.०४.२०२२ ते ३१.०३.२०२३ तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला
  7. आरक्षित प्रवर्गकरिता जातीचा दाखला व जात वैधता (पडताळणी) प्रमाणपत्र.
  8. जर आपणाला विशेष आरक्षित प्रवर्गातून (कलाकार,पत्रकार, राज्य शासन कर्मचारी, केंद्र शासन कर्मचारी,स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक व त्या वरील अवलंबीत व्यक्ती, म्हाडा कर्मचारी, दिव्यांग, आमदार व खासदार) अर्ज करवायचा असल्यास योग्य त्या प्रवर्गासमोरील ‘हो’ पर्याय निवडावा.
    विशेष सूचना : – विशेष आरक्षित प्रवर्गातील अर्जदाराने सादर केलेले प्रमाणपत्र हे सक्षम प्राधिकरणाकडून साक्षांकीत नसेल व जरी असे प्रमाणपत्र संगणकीय प्रणालीने स्विकारले तरी अशा अर्जदारांचे अर्ज कोणत्याही वेळी रद्द होण्यास पात्र असतील.

mhada lottery 2024 : अनामत रक्कम

अ. क्रउत्पन्न गटअनामत रक्कमअर्जासोबत भरवायची अनामत रक्कम व अर्ज शुल्क
रु.६०० /- + (जीएसटी @१८% )रुपये १०८/-
= एकूण  रु.७०८/-(विनापरतावा)
1अत्यल्प उत्पन्न गट
(EWS)
रुपये ५०००/-रुपये ५७०८/-
2अल्प उत्पन्न गट
(LIG)
रुपये १००००/-रुपये १०७०८/-
3२०% सर्वसमावेशक व म्हाडा गृहनिर्माण योजना (संकेत क्र.२४७ ते २५८)

अल्प उत्पन्न गट(LIG)
रुपये २००००/-रुपये २०७०८/-
4मध्यम उत्पन्न गट
(MIG)
रुपये १५०००/-रुपये १५७०८/-
5उच्च उत्पन्न गट
(HIG)
रुपये २००००/-रुपये २०७०८/-
अर्जदार रक्कम भरण्यासाठी Internet Banking/ Net Banking, RTGS, NEFT, Credit/Debit Card या पद्धतीचा वापर करू शकतात.

mhada lottery 2024 : लॉटरी मध्ये विक्रीसाठी  उपलब्ध असलेल्या  सदनिकांचा तपशील

संकेत क्रयोजनेचे नाव योजनेचा उत्पन्न गट एकूण सदनिकाअंदाजित विक्री किंमत
२०२७२६ सदनिका पैकी १४७ सदनिका , अत्यल्प गट,प्रधानमंत्री आवास योजना एम. आय. डि. सी. लातुरप्रधानमंत्री आवास योजना147९३७०००
२०४२२ सदनिका पैकी ०१ सदनिका  अत्यल्प गट,प्रधानमंत्री आवास योजना सिरसवाडी रोड जालनाप्रधानमंत्री आवास योजना1८००००
२०५२४० सदनिका पैकी ४ सदनिका  अत्यल्प गट,प्रधानमंत्री आवास योजना, नक्षत्रवाडी प्रधानमंत्री आवास योजना4१०६६८५७
२०६१३२ सदनिका पैकी ५६ सदनिका अत्यल्प गट,प्रधानमंत्री आवास योजना, हिंगोलीप्रधानमंत्री आवास योजना56८५३०००
२०७२६८ सदनिका पैकी २५ सदनिका अत्यल्प गट,प्रधानमंत्री आवास योजना, पडेगावप्रधानमंत्री आवास योजना25९९३०००
२०८२१८ भुखंडापैकी ०७ भुखंड, अत्यल्प उत्पन्न गट, भोकरदन, जि. जालना.अत्यल्प उत्पन्न गट7७९२००
२०९१८० गाळयापैकी २ गाळे, अत्यल्प उत्पन्न गट, अंबड, जि. जालना.अत्यल्प उत्पन्न गट2२२४५००
२१०२९ गाळयापैकी २ गाळे, अत्यल्प उत्पन्न गट, अंबड, जि. जालना-अत्यल्प उत्पन्न गट2२७००००
२११४७ सदनिका पैकी २० सदनिका, अत्यल्प उत्पन्न गट, सिरसवाडी रोड, जालना.अत्यल्प उत्पन्न गट30८०००००
२१२१२० गाळ्यांपैकी १ गाळे अत्यल्प उत्पन्न गट भोकरदनअत्यल्प उत्पन्न गट1२०६६२५
२१३८५ गाळयापैकी ८१ गाळे अत्यल्प उत्पन्न गट, अर्धापुर जि. नांदेडअत्यल्प उत्पन्न गट81६५७६०
२१४१० भूखंडापैकी ०२ भूखंड अत्यल्प उत्पन्न गट, अर्धापुर जि. नांदेडअत्यल्प उत्पन्न गट3७७२२६
२१५१२४ भूखंडापैकी ८६ भूखंड अत्यल्प उत्पन्न गट, मुदखेड जि. नांदेडअत्यल्प उत्पन्न गट86२८११२
२१६८६ गाळयापैकी ५६ गाळे अत्यल्प उत्पन्न गट, मुदखेड, जि. नांदेडअत्यल्प उत्पन्न गट56४२५००
२१७१५० भुखंडापैकी २ भुखंड अल्प उत्पन्न गट, भोकरदन जि.जालना-अल्प उत्पन्न गट2११४४६९
२१८९४ भुखंडापैकी ११ भुखंड अल्प उत्पन्न गट, स्टेशन रोड, जालना-अल्प उत्पन्न गट11२६२४००
२१९१४९ गाळ्यापैकी १ गाळे अल्प उत्पन्न गट भोकरदन जि. जालना.अल्प उत्पन्न गट1४२७१२५
२२०२५ गाळ्यापैकी २ गाळे अल्प उत्पन्न गट कन्नड जि. छत्रपती संभाजीनगरअल्प उत्पन्न गट2१२५२८९७
२२१२० गाळ्यापैकी १ गाळा अल्प उत्पन्न गट कन्नड जि. छत्रपती संभाजीनगरअल्प उत्पन्न गट1७०७२५०
२२२८० सदनिका पैकी १२ सदनिका, अल्प उत्पन्न गट, हिंगोली.अल्प उत्पन्न गट13१२५४९०५
२२३६९ गाळ्यापैकी ६ गाळे अल्प उत्पन्न गट, गंगाखेड रोड, परभणी.अल्प उत्पन्न गट6४२७०००
२२४८४ सदनिका पैकी २ सदनिका अल्प उत्पन्न गट, एम. आय. डि.सी. एरीया, धाराशिवअल्प उत्पन्न गट2१५६७६९०
२२५५९ भुखंड पैकी १५ भूखंड, अल्प उत्पन्न गट, नळदुर्ग, जि. धाराशिवअल्प उत्पन्न गट15१५९२७२
२२६४८ सदनिका पैकी २१ सदनिका, अल्प उत्पन्न गट, हिंगोलीअल्प उत्पन्न गट21११४९२००
२२७२०१ भूखंडापैकी १२६ भूखंड अल्प उत्पन्न गट, मुदखेड जि. नांदेडअल्प उत्पन्न गट136४६६४०
२२८१८ गाळयापैकी १८ गाळे अल्प उत्पन्न गट, मुदखेड, जि. नांदेडअल्प उत्पन्न गट18६५०००
२२९४२ गाळयापैकी ४१ गाळे अल्प उत्पन्न गट, अर्धापूर, जि. नांदेडअल्प उत्पन्न गट41७५३५०
२३००५ भूखंडापैकी ०१ भूखंड अल्प उत्पन्न गट, अर्धापुर जि. नांदेडअल्प उत्पन्न गट1८८६६०
२३१२० गाळयापैकी ०६ गाळे मध्यम उत्पन्न गट, हिंगोलीमध्यम उत्पन्न गट6२०९९७००
२३२७२ भूखंडापैकी ४२ भूखंड, मध्यम उत्पन्न गट, टोकवाडी ता. मंठा जि. जालनामध्यम उत्पन्न गट43१४६५४१
२३३१२ गाळयापैकी ०२ गाळे मध्यम उत्पन्न गट हिंगोलीमध्यम उत्पन्न गट2२०९९७००
२३४१९ भुखंड पैकी ०४ भूखंड, मध्यम उत्पन्न गट, नळदुर्ग, जि. धाराशिवमध्यम उत्पन्न गट4२९६०००
२३५४८ भुखंड पैकी ०१ भूखंड, उच्च उत्पन्न गट, भोकरदन जि. जालनाउच्च उत्पन्न गट1६६८२५०
२३६१६० सदनिकापैकी १० सदनिका सर्व उत्पन्न गट,एमआयडीसी, पैठण ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगरसर्व उत्पन्न गट10९८००००
२३७२४८ सदनिकापैकी १५ सदनिका, सर्व उत्पन्न गट, देवळाई, छत्रपती संभाजीनगरसर्व उत्पन्न गट15१५००६२५
२३८१६ सदनिकापैकी ०२ सदनिका, सर्व उत्पन्न गट, देवळाई, छत्रपती संभाजीनगरसर्व उत्पन्न गट2१५००६२५
२३९१२ सदनिकापैकी ०२ सदनिका, सर्व उत्पन्न गट, देवळाई, छत्रपती संभाजीनगरसर्व उत्पन्न गट2१६५०६८७
२४०१६ सदनिकापैकी ०३ सदनिका, सर्व उत्पन्न गट, देवळाई, छत्रपती संभाजीनगरसर्व उत्पन्न गट3१६५०६८७
२४१६२ सदनिकापैकी ६ सदनिका, सर्व उत्पन्न गट, देवळाई, छत्रपती संभाजीनगरसर्व उत्पन्न गट6१४२५५९४
२४२३२ सदनिकापैकी २ सदनिका, सर्व उत्पन्न गट, देवळाई, छत्रपती संभाजीनगरसर्व उत्पन्न गट2१५००६२५
२४३८ सदनिकापैकी १ सदनिका, सर्व उत्पन्न गट, देवळाई, छत्रपती संभाजीनगरसर्व उत्पन्न गट1१६५०६८७
२४४२ सदनिकापैकी १ सदनिका, सर्व उत्पन्न गट, देवळाई, छत्रपती संभाजीनगरसर्व उत्पन्न गट1११२५४६९
२४५४८ सदनिका पैकी २ सदनिका, मध्यम उत्पन्न गट गृहनिर्माण भवन, छत्रपती संभाजीनगरमध्यम उत्पन्न गट2२२८२९१०
२४६१६८ सदनिका पैकी २१ सदनिका, मध्यम उत्पन्न गट, पडेगाव, छत्रपती संभाजीनगरमध्यम उत्पन्न गट21२११२२००
२४७१८ सदनिका, मे. भूमी डेवलपर्स & पल इस्टेट डेवलपर्स, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगरअल्प उत्पन्न गट18२०८५४०५
२४८१४ सदनिका, अमित डेव्लपर्स, सातारा, छत्रपती संभाजीनगरअल्प उत्पन्न गट14२०४२८१२- २०६९७२५
२४९२० भूखंड, मे. संदिप कंन्ट्रक्शन & डेवलपर्स, नक्षत्रवाडी, छत्रपती संभाजीनगरअल्प उत्पन्न गट20४६७९१२-५१०१४२
२५०२० भूखंड, मे. संदिप कंन्ट्रक्शन & डेवलपर्स, नक्षत्रवाडी, छत्रपती संभाजीनगरअल्प उत्पन्न गट20४९२७१८-५१०७५८
२५१२२ सदनिका (रो-हाऊस) मे. रिजवान खान, रसूल खान, नक्षत्रवाडी, छत्रपती संभाजीनगरअल्प उत्पन्न गट22१६७२१२८
२५२५६ सदनिका, मे. बाहेती हाऊसिंग, सातारा, छत्रपती संभाजीनगरअल्प उत्पन्न गट56१२९७६१६- १४२८२४०
२५३१२ भूखंड, मे. विरा कंन्ट्रक्शन, नक्षत्रवाडी, छत्रपती संभाजीनगरअल्प उत्पन्न गट12४१२९४६-५१०६५५
२५४६४ सदनिका, मे. रिध्दी वियान वेन्चर्स, सातारा, छत्रपती संभाजीनगरअल्प उत्पन्न गट64२०१७६७५
२५५२२ पैकी १२ सदनिका, मे. डिल्क्स बिल्डकॉन देवळाई, छत्रपती संभाजीनगरअल्प उत्पन्न गट12१४०२४२४
२५६१६ सदनिका, मे. डिल्क्स पाल्मस फेज-२ देवळाई, छत्रपती संभाजीनगरअल्प उत्पन्न गट16१४४९२६०- १४७२९१२
२५७६० सदनिका, अल्प उत्पन्न गट, चिकलठाणा छत्रपती संभाजीनगरअल्प उत्पन्न गट60२४०००००
२५८९६ सदनिका, अल्प उत्पन्न गट, सिटीएस नं. १६२१५, वन वर्ल्ड, अवर वर्ल्ड, प्रतापनगर, शहानूरवाडी, छत्रपती संभाजीनगरअल्प उत्पन्न गट96२६६५०२५

mhada lottery 2024 : योजनांचे Images

block view 0 1 e1710419403162
Mhada Lottery
block view 0 3

1 thought on “Mhada Lottery 2024 : म्हाडा छत्रपती संभाजी नगर एकूण १३०२ सदनिकांची लॉटरी जाहीर; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे, सदनिकांची किंमत आणि सदनिकांचे ठिकाण…”

  1. Pingback: MHADA Nagpur Lottery 2024 :तुमच्या स्वप्नातील घराची किल्ली तुमच्या हाती! तुमच्या स्वप्नातील घरासाठी परवडणारी य

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top