प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर सिडकोकडून EWS (आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट) आणि सर्वसाधारण प्रवर्ग या दोन उत्पन्न गटासाठी एकूण ३३२२ सदनिकांची महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरी मध्ये तळोजा सेक्टर २१,२२,२७,३७, सेक्टर-३४ प्लॉट नं . १ आणि ६, सेक्टर-३६ प्लॉट नं. १ आणि २ तसेच द्रोणागिरी मधील सेक्टर ११ आणि सेक्टर १२ प्लॉट नं. ६३ व ६८ मधील एकूण 3322 घरांसाठी ही लॉटरी असून यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
सिडको लॉटरी 2024 (CIDCO lottery 2024) : आपल्या हक्काचं आणि स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. हेच लक्षात घेऊन म्हाडा, सिडकोकडून अल्प दरात घरे उपलब्ध करुन देण्यात येत असतात. आता सिडकोकडून महागृहनिर्माण योजना 2024 ची घोषणा करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर काढण्यात आलेल्या या लॉटरीत EWS (आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट) आणि सर्वसाधारण प्रवर्ग या दोन उत्पन्न गटासाठी एकूण ३३२२ घरांचा समावेश आहे. जाणून घेऊयात या लॉटरीच्या संदर्भात अधिक माहिती.
या योजनेत एकूण 3322 घरांचा समावेश आहे. यापैकी 312 घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत तर 3010 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गातील नागरिकांसाठी आहेत.
लॉटरी साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही सिडको च्या https://lottery.cidcoindia.com/ या संकेस्थळा वरती जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
सिडको लॉटरी 2024 वेळापत्रक (CIDCO lottery 2024 Time Table)
सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध | २६ जानेवारी २०२४ |
ऑनलाईन अर्ज नोंदणी | २६ जानेवारी २०२४ दुपारी १२:०० वाजता |
ऑनलाईन अर्जासाठी नोंदणी समाप्ती | २६ मार्च २०२४ रात्री ०८:०० वाजता |
सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात | ३० जानेवारी २०२४ दुपारी १२:०० वाजता |
सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची समाप्ती | २७ मार्च २०२४ रात्री ११:५९ वाजता |
ऑनलाईन पेमेंट स्वीकृती सुरुवात | ३१ जानेवारी २०२४ दुपारी १२:०० वाजता |
ऑनलाईन पेमेंटचा अंतिम दिनांक | २८ मार्च २०२४ रात्री ११:५९ वाजता |
ऑनलाईन पेमेंट (NEFT/RTGS) स्वीकृती | २८ मार्च २०२४ रात्री ११:५९ वाजता |
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी | ०५ एप्रिल २०२४ सायंकाळी ०५:०० वाजता |
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी | १० एप्रिल २०२४ सायंकाळी ०३:०० वाजता |
सोडत (स्थळ–सिडको भवन सभागृह,सातवा मजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४०० ६१४) | १९ एप्रिल २०२४ सकाळी ११:०० वाजता |
सोडतीमधील यशस्वी आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नवे संकेतस्थळावर प्रसिध्द करणे | १९ एप्रिल २०२४ सायंकाळी ०६:०० वाजता |
CIDCO lottery 2024: सर्वसाधारण आणि काही विशेष अटी
सिडको ने या लॉटरी साठी EWS (आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट) आणि सर्वसाधारण प्रवर्ग करीत काही सर्वसाधारण आणि काही विशेष अटी निश्चित केल्या आहेत.
A. सर्वसाधारण अटी
- अर्ज करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी नसावे.
- EWS (आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट) आणि सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदाराचे महाराष्ट्रातील कोणत्याही भागात सलग १५ वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिवास प्रमाण पत्र(Domicile Certificate ) सादर करणे आवश्यक राहील.
- अर्ज हा एका व्यक्तीचा नावावर किंवा संयुक्त नावाने करता येईल. संयुक्त नावा मध्ये सहर्जदार हा केवळ पती / पत्नी असू शकते आणि अर्जदार जर अविवाहित असल्यास सहर्जदार म्हणून आई असू शकेल.
B. विशेष अटी – EWS(आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट) यांसाठी असणाऱ्या सदनिकांची पात्रता निकष
- अर्जदार किंवा त्याची पती/पत्नी आणि त्यांची अज्ञान मूले यांच्या नावावर भारतात कोठेही पक्के घर नसावे प्रतिज्ञापत्र अर्जदारास छाननी प्रक्रिये वेळी साजरे करावे लागेल.
- अर्जदार याचे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. ६०००००/- पर्यंत असावे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे व त्याची पती/पत्नी यांचे उत्पन्न असल्यास दोघांचे मिळून दिलेल्या वित्तीय वर्षाकरिता सलग १२ महिन्याचे म्हणजेच दिनांक ०१/०४/२०२२ ते ३१/०३/२०२३ या कालावधीतील उत्पन्न या संज्ञेत पगारातील मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांचा समावेश राहील.
- जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास) इतर आरक्षित प्रवर्गकरिताचे प्रमाणपत्र योग्य त्या नमुन्यामध्ये सादर करावे.
- सदर सदनिका विक्री करारनामा केल्याच्या तारखेपासून ५ वर्षाच्या कालावधीत फेरविक्री / हस्तांतरण करता येणार नाही. मंडळाच्या लेखी परवानगी नंतर आणि हस्तांतरण शुल्काचा भरणा केल्यानंतर अर्जदार ज्या आरक्षित प्रवर्गातील आहे त्याच सामान प्रवर्गात हस्तांतरण करण्यात येईल.५ वर्षाच्या कालावधी नंतर अंध किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती , राज्य शासकीय कर्मचारी , नवी मुंबई क्षेत्रातील पत्रकार , नवी मुंबई क्षेत्रातील प्रकल्पगस्त , माजी सैनिक , नवी मुबईतील माथाडी कामगार व सर्व साधारण गट या प्रवर्गात दिलेल्या सदनिकांची फेरविक्री / हस्तांतरण कुठल्याही प्रवर्गात करण्यास हस्तांतरण शुल्काचा भरल्यानंतर सिडको तर्फे परवानगी मिळू शकेल, परंतु नंतर त्यांना सिडको च्या गृहनिर्माण योजनांमध्ये अर्ज करता येणार नाही.
- प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत अर्जदारांनी केंद्र शासनाच्या http://pmaymis.gov.in या संकेत स्थळावर अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
- सदर योजनेत अर्जदारांची माहित छाननी प्रक्रियेपूर्वी सिडको तसेच प्रधानमंत्री अवास योजनेच्या संकेतस्थळाच्या सहकार्यांने अर्जाची तपासून अंतिम पात्र अर्जदार ठरविण्यात येतील. चुकीच्या / खोट्या नावाने केले अर्ज तसेच ज्यांनी प्रधानमंत्री अवास योजनेचा लाभ आधीच घेतला आहे ते रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी.
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील यशस्वी अर्जदारांना खालील प्रमाणे अनुदान प्राप्त होईल.
केंद्र शासन – रु. 1.50 लक्ष
राज्य शासन – रु. 1.00 लक्ष - अनुदानाची रक्कम ही यशस्वी अर्जदारांच्या हफ्त्याच्या रकमेमध्ये केंद्र शासन व राज्य शासनाकडून प्राप्त झाल्यावर समायोजित करण्यात येईल. केंद्र शासन व राज्य शासनाकडून प्राप्त न झालेली रक्कम हि अर्जाराकडून वसूल करण्यात येईल.
B. विशेष अटी -सर्वसाधारण प्रवर्गाकरिता बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी पात्रता निकष
- अर्जदार किंवा त्याची पती/पत्नी यांचे आणि त्यांची अविवाहित मुले यांचे नावे नवी मुंबईत कोठेही पक्के घर नसावे प्रतिज्ञापत्र अर्जदारास छाननी प्रक्रिये वेळी साजरे करावे लागेल.
- सर्वसाधारण प्रवर्गाकरिता वार्षिक उत्पन्न (२०२२-२३) रु. ६०००००/- लाखापेक्षा अधिक असावे.
- जातीचा दाखल व जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास) इतर आरक्षित प्रवर्गकरिताचे प्रमाणपत्र योग्य त्या नमुन्यामध्ये सादर करावे.
- सदर सदनिका विक्री करारनामा केल्याच्या तारखेपासून ३ वर्षाच्या कालावधीत फेरविक्री / हस्तांतरण करता येणार नाही. मंडळाच्या लेखी परवानगी नंतर आणि हस्तांतरण शुल्काचा भरणा केल्यानंतर अर्जदार ज्या आरक्षित प्रवर्गातील आहे त्याच सामान प्रवर्गात हस्तांतरण करण्यात येईल. ३ वर्षाच्या कालावधी नंतर अंध किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती , राज्य शासकीय कर्मचारी , नवी मुंबई क्षेत्रातील पत्रकार , नवी मुंबई क्षेत्रातील प्रकल्पगस्त , माजी सैनिक , नवी मुबईतील माथाडी कामगार व सर्व साधारण गट या प्रवर्गात दिलेल्या सदनिकांची फेरविक्री / हस्तांतरण कुठल्याही प्रवर्गात करण्यास हस्तांतरण शुल्काचा भरल्यानंतर सिडको तर्फे परवानगी मिळू शकेल, परंतु नंतर त्यांना सिडको च्या गृहनिर्माण योजनांमध्ये अर्ज करता येणार नाही.
CIDCO lottery 2024: सोडतीसाठी नोंदणी करीत असताना सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे
- पॅन कार्ड(PAN Card).
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न.
- आरक्षण प्रवर्ग (अर्जदार एकपेक्षा जास्त प्रवर्ग निवडू शकतो).
- अर्जदार सध्या राहत असलेल्या घराचं संपूर्ण पत्ता व पोस्टाचा पिनकोड क्रमांक.
- आधार क्रमांक.
- अर्जदाच्या बँक खात्याचा तपशील.
- अर्जदाराचा मोबाइल नंबर आणि ई-मेल id.
- अर्जदाराचे स्वतःचे ५०kb पर्यंत चे jpej फॉरमॅट मध्ये असलेलं छयाचित्र.
- रद्द केलेल्या धनादेशाचे (Cheque) jpeg फॉरमॅट मधील फोटो.
CIDCO lottery 2024 : अनामत रक्कम आणि रक्कम भरायची पद्धती
CIDCO lottery 2024 मध्ये EWS(आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट) यांसाठी अनामत रक्कम रु. ७५०००/- आणि सर्वसाधारण प्रवर्गाकरिता अनामत रक्कम रु. १५००००/- अधिक विनापरतावा अर्ज शुल्क रु. २९५/- (रु. २५०/- अधिक GST रु. ४५) भरणा आहे.
अर्जदार रक्कम भरण्यासाठी Internet Banking/ Net Banking, RTGS, NEFT, Credit/Debit Card या पद्धतीचा वापर करू शकतात.
CIDCO lottery 2024 : लॉटरी मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांचा तपशील
अ.क्र | सदनिकेचे ठिकाण | सदनिकेचा प्रकार | सदनिकेचा ताबा देण्याचे वर्ष | एकूण सदनिका | चटई क्षेत्र(चौ. मी.) अंदाजे | विक्री किंमत अंदाजे |
1 | सेक्टर ११, प्लॉट नं. १ द्रोणागिरी | आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट | ताबा देण्यास तयार घरे | 18 | 25.81 | 22,18,059 |
सर्वसाधारण प्रवर्ग | 114 | 29.82 | 30,17,682 | |||
एकूण | 132 | |||||
2 | सेक्टर १२, प्लॉट नं. ६३ द्रोणागिरी | आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट | ताबा देण्यास तयार घरे | 22 | 25.81 | 22,18,059 |
सर्वसाधारण प्रवर्ग | 127 | 29.82 | 30,17,682 | |||
एकूण | 149 | |||||
3 | सेक्टर १२, प्लॉट नं. ६८ द्रोणागिरी | आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट | ताबा देण्यास तयार घरे | 21 | 25.81 | 22,18,059 |
सर्वसाधारण प्रवर्ग | 133 | 29.82 | 30,17,682 | |||
एकूण | 154 | |||||
4 | सेक्टर २१ तळोजा | आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट | ताबा देण्यास तयार घरे | 29 | 25.81 | 21,71,556 |
सर्वसाधारण प्रवर्ग | 113 | 29.82 | 30,58,578 | |||
एकूण | 142 | |||||
5 | सेक्टर २२ तळोजा | आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट | ताबा देण्यास तयार घरे | 9 | 25.81 | 21,71,556 |
सर्वसाधारण प्रवर्ग | 78 | 29.82 | 30,58,578 | |||
एकूण | 87 | |||||
6 | सेक्टर २७ तळोजा | आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट | ताबा देण्यास तयार घरे | 56 | 25.81 | 22,31,010 |
सर्वसाधारण प्रवर्ग | 299 | 29.82 | 31,12,786 | |||
एकूण | 355 | |||||
7 | सेक्टर-३४ प्लॉट नं . १ तळोजा | आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट | जून २०२४ पासून(ताबा देण्याचा दिनांक बदलू शकतो) | 49 | 25.56, 25.81,25.61 | 23,59,623 |
सर्वसाधारण प्रवर्ग | 354 | 29.60, 29.82 | 34,40,716 | |||
एकूण | 403 | |||||
8 | सेक्टर-३४ प्लॉट नं . ६ तळोजा | आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट | 42 | 25.56, 25.81,25.61 | 23,59,623 | |
सर्वसाधारण प्रवर्ग | 533 | 29.60, 29.82 | 34,40,716 | |||
एकूण | 575 | |||||
9 | सेक्टर-३६ प्लॉट नं. १ तळोजा | आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट | 26 | 25.56, 25.81,25.61 | 23,59,623 | |
सर्वसाधारण प्रवर्ग | 611 | 29.60, 29.82 | 34,40,716 | |||
एकूण | 637 | |||||
10 | सेक्टर-३६ प्लॉट नं. २ तळोजा | आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट | 20 | 25.56, 25.81,25.61 | 23,59,623 | |
सर्वसाधारण प्रवर्ग | 540 | 29.60, 29.82 | 34,40,716 | |||
एकूण | 560 | |||||
11 | सेक्टर ३७ तळोजा | आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट | ताबा देण्यास तयार घरे | 20 | 25.81 | 21,71,556 |
सर्वसाधारण प्रवर्ग | 108 | 29.82 | 30,58,578 | |||
एकूण | 128 | |||||
सर्व योजनेची एकूण बेरीज | आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट | 312 | ||||
सर्वसाधारण प्रवर्ग | 3010 | |||||
एकूण | 3322 |
CIDCO lottery 2024 : लॉटरी मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांचा महारेरा नोंदणी क्रमांक
अ.क्र | सदनिकेचे ठिकाण | महारेरा नोंदणी क्रमांक |
1 | सेक्टर ११, प्लॉट नं. १ द्रोणागिरी | P52000017480 |
2 | सेक्टर १२, प्लॉट नं. ६३ द्रोणागिरी | P52000017365 |
3 | सेक्टर १२, प्लॉट नं. ६८ द्रोणागिरी | P52000017368 |
4 | सेक्टर २१ तळोजा | P52000017439 |
5 | सेक्टर २२ तळोजा | P52000017425 |
6 | सेक्टर २७ तळोजा | P52000017438 |
7 | सेक्टर-३४ प्लॉट नं . १ तळोजा | P52000022174 |
8 | सेक्टर-३४ प्लॉट नं . ६ तळोजा | P52000022171 |
9 | सेक्टर-३६ प्लॉट नं. १ तळोजा | P52000022182 |
10 | सेक्टर-३६ प्लॉट नं. २ तळोजा | P52000022173 |
11 | सेक्टर ३७ तळोजा | P52000017447 |
Pingback: Mhada Lottery 2024 : म्हाडा छत्रपती संभाजी नगर एकूण १३०२ सदनिकांची लॉटरी जाहीर; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे,
Pingback: MHADA Nagpur Lottery 2024 :तुमच्या स्वप्नातील घराची किल्ली तुमच्या हाती! तुमच्या स्वप्नातील घरासाठी परवडणारी य
Pingback: MHADA Pune Lottery 2024 :पुणे लॉटरीबद्दल तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती, जाणून घ्या महत्त्वाची तारीख, पात्